बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर उबाटाचा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा..500 ट्रॅक्टरसह शेतकरी झाले रखरखत्या उन्हात सहभागी :

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या , पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ,शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्या कापसला 12 हजार रुपये हमी भाव द्या यासह अन्य मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज 2 मे ला उबाटातर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होते
या मोर्चामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते तपुर्वी जिजामाता मैदानावर शेतकरी सभा झाली यासभेला शिवसेनेच्या प्रवक्ता जयश्री शेळके आमदार सिद्धार्थ खरात सपर्क प्रमुख नरेद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृवात हा ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केल होत सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळून देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्यावतीने या अभिनव ट्रॅक्टर मोर्चा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन पोहचलेल्या या मोर्चातील एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले या आंदोलनात जवळपास 500 ट्रॅक्टर शेतकऱ्यांसह सहभागी झाले होते ..