मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये सामाजिक समता पंधरवडा निमित्य कार्यक्रम संपन्न*

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्व समाजाला दिशादर्शक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे असे प्रतिपादन साहित्यिक सुरेश साबळे यांनी व्यक्त केला
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समता पंधरवड्या अंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन 12 एप्रीलला बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्य आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहे बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावातील लोकांनी इंग्रजांना दिलेल्या नोटीसची दखल बाबासाहेबांनी घेऊन ते पातुर्डा येथे आले होते असं सांगत त्यांनी बुलढाणा जिल्ह्याशी जुळलेल्या ऐतिहासिक सामाजिक संदर्भाना उजाळा दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ अण्णासाहेब म्हळसणे हे होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा वाघ यांनी सूत्रसंचालन डॉ दाभाडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा ढोणे यांनी केले या कार्यक्रमाला मॉडेल कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक उपस्थित होते