ब्रेकिंग न्यूजराजकीय वार्तासमाजीक वार्ता

16 एप्रीलला होणार देऊगावराजा तालुक्यातील सरपंच पदांची आरक्षण सोडत

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय, देऊळगाव राजा येथील निवडणूक विभाग येथे सोडत काढण्यासाठी सभा आयोजित करण्यात आले आहे.

तसेच अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती. नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता सुरु होणार असुन उपविभाग सिंदखेड राजा अंतर्गत देऊळगांवराजा तालुक्याचे स्त्रियांकरिता आरक्षण सोडत ठिक दुपारी 12.00 वाजता जिल्हानियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडती करीता देऊळगांवराजा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्या बाबत देऊळगांवराजा तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button