शासकीय वार्ताशैक्षणीक वार्तासमाजीक वार्ता
चिखलीत होणार अंगणवाडीताईची पद भरती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामिण प्रकल्प चिखली अंतर्गत 20 महसूली गावांत 6 सेविका व 19 मदतनीस असे एकूण 25 रिक्त पदाची भरती होणार आहेत. या पदाकरीता दि. 4 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज स्विकृत केले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांनी केले आहे.भरती प्रक्रिया अटी व शर्तीनुसार पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये व कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.