महाराष्ट्रराजकीय वार्तासमाजीक वार्ता

शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक ..केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

बुलढाणा (प्रतिनिधी )हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी आणि समाजाला स्फूर्तीदायक असल्याच प्रतिपादन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे केलं


आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 फेब्रुवारीला बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे होते तर अतिथी म्हणून मालोजी राजे शाहू छत्रपती , खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात बोलताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली असून आजच्या ही पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा स आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये लोकांच्या हिताची कामे केलीत . अशा स्वरूपाची कामे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं सातासमुद्र पार ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा केला जातो हे मराठी माणसासाठी आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे हे सुद्धा येणार होते त्यांच्या शुभेच्छा घेवुन मी तुमच्यापर्यंत पोहचवत आहे असे ही प्रतापराव जाधव यांनी सांगीतलं .अबुधाबी येथील मराठी माणसांसोबत त्यांनी संवाद साधला या कार्यक्रमाला अबुधाबी येथील मराठी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

दुबई येथे महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार … केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

आखाती देशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्र येऊन सामाजिक कार्यक्रम साजरी करता यावे यासाठी दुबईत महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र स्तरातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे नागरिकांशी संवाद साधताना दिली यावेळी उपस्थितांनी जय भवानी जय शिवरायचा जयघोष करून घोषणेच स्वागत केलंय ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button