कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती …! मिळालेला संधीच मी निश्चित सोनं करेल सपकाळांची पहिली प्रतिक्रिया..!!

सर्वसामान्य परिवारातीलआणि कुठल्याही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचा मी निश्चित सोनं करेल अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली..
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाणा येथील काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थाना समोर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला .प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलत असतांना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्ती केली ती पुढे म्हणाले की जाती-धर्माच्या नावावर चाललेला नंगा नाच थांबवण्याची आवश्यकता आहे – कोण कोण्या जातीचा हे बघून जर किराणा घेतला जात असेल, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनासाठी महाराजांना बोलावलं जात असेल तर हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला अशोभनीय आहे, हा शाप दूर करण्याची आवश्यकता आहे…
एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची संस्कृती पुढे घेऊन जाणार आहोत…
फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजाचे मूल्य आजही काही राजकारणी अमलात आणत आहेत अशी प्रतिक्रिया ही त्यांनी माध्यमासमोर व्यक्त केली