राजकीय वार्ता
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी घेतले श्रींचे दर्शन

बुलढाणा,दि. २६ : जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले.
- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर होते. बुलढाणा येथील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय ध्वजारोहण करुन त्यांनी आज शेगांव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान येथे देवून भेट दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार मनोज कायंदे, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा, वसंतराव शिंदे, उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी, शेगावचे तहसिलदार दिपक बाजड, नगर परिषद मुख्याधिकारी जयश्री काटकर आदी उपस्थित होते.