रेती उपसा करणाऱ्या 15 बोटी प्रशासनाने केल्या ब्लास्टव्दारे नेस्तानाबुत …! जाफ्राबाद येथील 12 बोटीचा आणि बुलडाणा जिल्ह्यातील केवळ 3 बोटीचा समावेश .. !!

अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या 15 बोटी जिलेटिगचा स्पोट घडवून नेस्तानाबुत करण्यात आल्या आहेत ही करावाई बुलढाणा आणि जालना प्रशासनाने संयुक्तरित्या केली असून यातील तीनच बोटी या बुलढाणा जिल्ह्यातील आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या कारवाईचा सुगावा रेती माफियांना लागला तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे ….
अवैधरित्या रेती उत्खनना संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती माध्यमांना देण्यात आली आहे उतखनन करणाऱ्या 15 बोटी प्रशासनाने स्पोर्ट घडून नेस्तानाभूत केल्या आहेत ही कारवाई स्वागतार्ह आहे पण यातील 12 बोटी हया जालना जिल्ह्यातील जाफ्राराबाद परिसारातील आहेत तर केवळ तीन बोटी बुलढाणा जिल्ह्यातील आहे या कारवाईसाठी जिलेटीन बुलडाणा जिल्हा प्रशासनाने पुरविल्याची माहितीच खुद्द जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिली …परंतु आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन होत असताना केवळ तीनच बोटी सापडणे म्हणजेच या कारवाईची माहिती रेती माफीया मिळाली होती हे मात्र निश्चित … रेती माफिया माहिती पुरविणाऱ्याचा शोध घेणे प्रशासनासाठी महत्वाचे आहे . रेती उत्खनन कारवाई करतांना बुलढाणा जिल्ह्यातील शेणगाव जहागीर येथील तीन मजुर सापडले आहेत त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे परंतु या बोटी मालकावरही गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे तरच या कारवाईचं फलित होईल ..