विधिमंडळात घुमला बुलढाण्याचा आवाज …! शहरातील अवैध वरली मटक्यांची दुकाने झाली बंद ..!!
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यकर्तेमध्ये कायदे व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून भाजीपाल्याचे दुकाने लावावीत तशी पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशनच्या जवळपास वरली मटक्याची दुकाने सुरू आहेत असा आरोप करत पोलीस हप्ते घेण्यात मग्न असल्याचा घनाघात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी 18 डिसेंबरला औचित्याचा मुद्दा उपस्थित करून विधिमंडळात मांडला होता ..
त्याचे पडसाद उमटले असून अकार्यक्षम असलेले पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसुन आले आहे बुलढाण्याचा आवाज …आमदार संजू भाऊ गायकवाड … यांनी विधिमंडळात पोलीस अकार्यक्षमतेबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांची यंत्रणा खरबडून जागी झाली आहे बुलढाणा शहरातील वरली मटका चक्री सारखे अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत … आता हे धंदे कायमस्वरूपी बंद राहणार की अधिवेशन संपताचा पुन्हा सुरू होणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे .. या सर्व प्रश्नांचे उत्तर येणारा काळच देणार आहे …!!