क्राईमवार्ता
पत्रकाराचं घर फोडीलं , चोरट्यांनी मारला यावर ताव ..! पोलीस पेट्रोलिंग होत नसल्याची नागरिकांची ओरड…!!

बुलढाणा शहरासह जिल्ह्यात चोरी घरफोडी च्या अनेक घटना घडत आहेत.. ज्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांच्या घरी देखील चोऱ्या झाल्या आहेत, चोरट्यांना पोलिसांचा अजिबात धाक राहिला नसल्याचं चित्र आहे, नुकतच बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रो हाऊस मध्ये राहणाऱ्या पुढारी न्यूज चॅनलचे पत्रकार संदीप वानखेडे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे, यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय, एवढेच नव्हे तर चोरट्यांनी दूध आणि मलई वर देखील ताव मारलाय.. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात आरोपीवर घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय.. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत, तर सदर परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे…