अनुकंपाधारक जेष्ठता यादी जाहिर …
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत सन 2024 ची अनुकंपाधारक उमेदवारांची सुधारीत अंतीम जेष्ठता यादी जिल्हा परिषदच्या www.zpbuldana.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अनुकंपा पदभरतीची कार्यवाही करण्यापुर्वी सन 2024 च्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या अंतीम जेष्ठता यादीतील अ.क्र. 1 ते 244 पर्यंत उमेदवारांची मुळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांची शैक्षणिक अर्हतेची माहिती अद्यावत करण्यासाठी अंतिम जेष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांनी दि. 18 व 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे मुळ कागदपत्र तपासणी करण्याकरीता उपस्थित राहावे. याची सर्व अनुकंपाधरक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) यांनी केले आहे.