ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय वार्ता
खामगावचे आमदार आकाश फुंडकर मंत्री म्हणून घेणार शपथ
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथे होत आहे या मंत्रिमंडळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांची वर्णी लागली आहेत
आकाश फुंडकर हे भाजपाचे आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यांचे वडील स्वगीय भाऊसाहेब फुंडकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष , विरोधी पक्ष नेते आणि कृषी मंत्री म्हणूनही काम पाहीले होते . ओबीसी चेहरा म्हणून आकाश फुंडकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आला आहे