राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल… केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेत विश्वास
बुलडाणा ( प्रतिनिधी )राज्यातील महायुतीच्या सरकारने 17 आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून लहान समाज असलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलंय या सरकारच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतल्या गेले आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला
बुलढाणा रेसिडेन्सी येथे आज 18 नोव्हेंबरला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकोपयोगी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या बाजूने उभी राहणार आहे गेल्या 75 वर्षांमध्ये राज्यातील छोटे छोटे समाज दुर्लक्षित राहिले होते या समाजाच्या हितासाठी राज्यातील महायुतीच्या सरकारने 17 आर्थिक विकास मंडळाची स्थापना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे राज्यातील महायुती सरकारने प्रत्येक समाजाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविल्या जात आहे महिला बचत गटांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध करून करून देण्यात येत आहेत शिवाय एमआयडीसी मध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारून तेथे बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची पॅकेजिंग करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील लखपती दीदीच स्वप्न साकार होणार आहे बचत गटाच्या खेळत्या भांडवलातही वाढ करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या मतदारसंघात झालेली विकास कामे ही लोकांसमोर आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती उमेदवाराला बुलढाण्यातील जनता निवडून देणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड भाजपाचे तालुकाध्यक्ष मोहन पवार सिद्धार्थ शर्मा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मायाताई म्हस्के शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिग राजपूत उपस्थित होते