बुलढाणा आणि चिखली मतदारसंघात भाजप शिवसेने अंतर्गत कटकारस्थात ? कोण बाजी मारणार …
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयराज शिंदेची समजूत काढणार का ?

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्यावतीने आमदार संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे असताना महायुतीच्या घटक पक्षातील भाजपा नेते व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे
अशा वेळेस भाजपाला शह देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार संजय गायकवाड यांनी पुत्र मृत्युंजय संजय गायकवाड यांचा चिखली विधानसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज भरला आहे
चिखली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले आहेत ताईंचे पती विद्याधर महाले हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्वेताताईंचा नामांकन अर्ज भरण्यासाठी चिखली आले होते श्वेताताई महाले व देवेंद्र फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध आहेत हे लक्षात घेऊन बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विजयराज शिंदे यांची बंडखोरीला पूर्णविराम देण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच फोन येण्याच्या दृष्टिकोनातून मृत्युंजय गायकवाड यांची उमेदवारी चिखली विधानसभा मतदारसंघात संघातून दाखल करून संजू भाऊनी खेळी खेळली आहे आज विजयराज शिंदे भाजपा पक्षश्रेष्ठीला भेटून उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत त्यामुळे बुलढाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कटकारस्थान आणि राजकीय खेळीत कोण बाजी मारत हे येणाऱ्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे ..