लोकशाही टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवावा
सुनील सपकाळ यांचे माननीय राज्यपाल यांना निवेदन
महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी.पी. राधाकृष्णन हे आज बुलढाणा दौऱ्यावर आले असता, लोकमंच या बुलढाण्यातील सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ असलेल्या संस्थेचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुनील सपकाळ यांनी महामहीम यांना माँ जिजाऊ व बाळशिवाजी यांची प्रतिमा भेट दिली व त्यासोबतच आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही दिले.मागील काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खोळंबलेल्या निवडणुका घेण्यात याव्या.तसेच 2005 नंतर शासकीय सेवेत सामील झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यासह प्रा. सुनील सपकाळ यांनी माननीय राज्यपाल यांना स्वायत्त संस्थावर सत्ताधारी पक्षांचा होणारा हस्तक्षेप थांबवावा आणी लोकशाही टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षावर अंकुश लावावा अशाही मागण्या केल्या.जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत घटनात्मक पदावर बसलेल्या राज्यातील प्रथम व्यक्तीला आपल्या मागण्या सादर करून सुनील सपकाळ यांनी , सार्वत्रिक निवडणुकांवर जनतेच्या कराच्या पैशातून होणाऱ्या अवास्तव खर्चावर पायबंद घालण्याबाबतही मा. राज्यपाल यांना विनवले.