शासकीय वार्ताशैक्षणीक वार्तासमाजीक वार्ता

तांदुळवाडीच्या अंगणवाडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना काव्यांजली अन् अभिवादन

सिंदखेडराजा / प्रतिनिधी

स्त्री शिक्षणाची जननी आणि दीन-दलितांच्या अंधकारमय जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरणारी ‘माऊली’ म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांच्या १२९ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, तालुक्यातील सिंदखेडराजा येथील जांभोरा बीड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात ,अत्यंत भारावलेल्या आणि उत्स्फूर्त वातावरणात अभिवादन सोहळा संपन्न झाला .क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अलौकिक कार्याला त्रिवार वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावित्रीमाईंच्या त्यागाचा आणि संघर्षाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
“सावित्रीच्या लेकींनी आज जे प्रगतीचे शिखर गाठले आहे, त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांच्या धैर्याने रचला गेला आहे,” अशा शब्दांत त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले.
या मंगलमयी प्रसंगी अंगणवाडीच्या सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी सावित्रीमाईंच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. त्यांना मदतनीस सौ. साधना राजरत्न खरात यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही ‘सावित्री फुले यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी: कोहिनूर खरात, वेदिका नागरे तसेच पालक वर्ग: धोंडिबा नागरे, दरूबाई खरात, सुनिता खरात आणि जागृती काळे उपस्थित होते.केवळ औपचारिकता न पाळता, सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी पालक आणि सेविकांनी केला. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीमाईंचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. अत्यंत साध्या पण प्रभावी पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाने तांदुळवाडी परिसरात ज्ञानाचा जागर पुन्हा एकदा प्रज्वलित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button