राजकीय वार्ताशासकीय वार्ताशैक्षणीक वार्तासमाजीक वार्ता

राज्यात आयुष मंत्रालय आणि विद्यापीठ स्थापने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची घेतली केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट*

बुलढाणा (प्रतिनिधी)
राज्यात नवीन स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि आयुष विद्यापीठ स्थापने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,सुनेत्रा पवार यांची काल केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट घेऊन मागणी केली आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये आयुष मंत्रालय नव्याने स्थापन केले याच मंत्रालयांतर्गत आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा उपयोग करून आरोग्य सेवेबाबत काम केले जात आहे .राज्यात सुद्धा आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यास आयुष अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती मिळेल आणि लोकांना सहज सुलभ सेवा देता येणार आहे त्यासाठी राज्यात आयुष मंत्रालयाची आणि आयुर्वेदिक विद्यापीठाची स्थापना करावी अशी मागणी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही भेट घेऊन या संदर्भत त्यांच्यासोबत ही चर्चा केली

केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे 6 मार्च रोजी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी
आज विधानभवन येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत करून शाल व पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. आणि महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव निमित्त प्रकाशित करण्यात आलेले “विधान परिषदेने संमत केलेली महत्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे” हे पुस्तक नामदार प्रतापराव जाधव यांना भेट म्हणून दिले. या भेटीदरम्यान आयुष मंत्रालयामार्फत देशभरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे व कामाचे कौतुक केले.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी कैतुक केले यावेळी ज्येष्ठ संपादक योगेश त्रिवेदी आणि किशोर आपटे उपस्थित होते

. त्यांनतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील जलसंपदा विभाग अंतर्गत विकासात्मक कामांसंदर्भात आणि ग्राम विकास विभागाच्या योजना , वर्ग तीर्थक्षेत्र विकास कामांच्या निधी उपलब्ध करुन देण्यात बाबत चर्चा केली यावेळी निधी उपलब्धते दोन्ही मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवीली ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button