उत्तम आरोग्य व समृध्द राष्ट्र निर्माण करण्यासाठी, 2026 च्या अर्थसंकल्पात आयुषला प्राधान्य.. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव

2026 चा अर्थसंकल्प हा विकसीत भारताच्या संकल्पनेचा मार्ग सुकर करणारा तसेच आयुष आणि आधुनिक औषधांचा संगम हा भारतातील आरोग्य सेवा अधिक मजबुत करण्यासाठी आणि 10,000 कोटी किमंतीचा “बायोफार्मा शक्ती ” सारख्या सुधारणा हया आरोग्य सेवेला सक्षम करण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहेत. अशी प्रतिक्रीया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यानी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक,महीला विदयार्थी आणि तरुणांना विकासाच्या संधी उपलब्ध करुन देणारा आणि सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा सोबतच देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. उत्तम आरोग्य आणि समृध्द राष्ट्र निर्माण करण्यासाठी 2026 च्या अर्थसंकल्पामध्ये आयुष आणि आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये आयुर्वेद क्षेत्रात उच्य गुणवत्तेचे शिक्षण आणि संशोधन करण्यासाठी तीन नविन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आयुष फार्मसी आणि औषध चाचणी प्रयोगशाळांना सुधारण्यासाठी तरतुद करण्यात आली आहे. पारंपारीक औषधांसाठी गुणवत्तापुर्वक संस्थांना अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पारपांरीक आयुर्वेदीक औषध निर्मीतीसाठी संशोधन कार्याला गती देण्यात येणार आहे. जामनगर येथिल WHO जागतिक पारंपारीक औषध केंद्राची श्रेणी सुधारणीचाही प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. नविन पाच प्रादेशिक वैद्यकिय मुल्य पर्यटन केंद्रामध्ये आयुष केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे.
“बायोफार्मा शक्ती” योजना भारताला जागतिक जैवफार्मा उत्पादन हब बनविण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी आरोग्य व बायोफार्मा क्षेत्रासाठी राखुन ठेवण्यात आला आहे. या योजने अंतर्गत बायोलॉजिक्स व बायोसिमीलर्स उत्पादन सक्षम करण्यात येणार आहे. बायोफार्मा आधारीत औषध संशोधन व निर्मीती क्षमता वाढविण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले असुन या योजनेमुळे देशांतर्गत विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. नविन राष्ट्रीयकृत फार्मास्युटीकल एज्युकेशन रिसर्च संस्थाची (nipers) स्थापना करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विदयमान संस्थांमध्ये प्रगती होवुन संशोधन कौशल्य विकास वाढविण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळे आरोग्य संशोधन,तंत्रज्ञान औषध विकासातील भारतातील जाळे सशक्त होणार आहे. भारतात 1000 मान्यताप्राप्त क्लिनीक ट्रायल साईट संस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे त्यामुळे नविन औषध निर्मीती विकास प्रक्रिया जलद होवुन गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. डायबिटीस, कर्करोग व ॲटो-इम्युन रोगांच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्याने बायोफार्मा औषधांची गरज भविष्यात पडणार आहे. बायोफार्मा शक्ती या योजने अंतर्गत रुग्णांसाठी उच्य दर्जाची औषधे निर्माण करुन ती औषधे सर्वसामान्यांना परवडणारे करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये आपातकालीन व ट्रामा केअर केंद्राची स्थापना करुन 50% क्षमता वाढविण्यायचे उदिष्ट या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे.
या अर्थसंकल्पात आयुर्वेद, योगा आणि पारंपारीक उपचार प्रणालीला महत्वाचे स्थान दिल्या गेले आहे. नविन आयुष केंद्रे आणि शिक्षण संशोधन संस्था वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आयुर्वेद, योगा आणि इतर आयुष सेवा आंतरराष्ट्रीय आरोग्य वेलनेस हब म्हणून विकसीत करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे त्यामुळे आरोग्य आणि वेलनेस पर्यटनसाठी नविन संधी निर्माण होणार आहे.
उत्तम आरोग्य आणि समृध्द राष्ट्र निर्माण करण्यासाठी 2026 च्या अर्थसंकल्पामध्ये आयुष आणि आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे आभार मानुन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे



