बुलढाणा शहरातील बहुप्रतिक्षित नळ योजना पूर्ण होत असल्याने बुलढानेकरांना मिळणार नियमित पाणी !
कंत्राटदाराला दिवाळी पूर्वी काम पूर्ण करण्याचे अल्टिमेटम

: दिवाळी पूर्वी बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; बुलढाणेकरांची दिवाळी होणार गोड..
पाच फेज पैकी चार फेजचे काम पूर्ण
बुलढाणा शहरातील बहुप्रतिक्षित नळ योजना पूर्ण होत असल्याने बुलढानेकरांना मिळणार नियमित पाणी
कंत्राटदाराला दिवाळी पूर्वी काम पूर्ण करण्याचे अल्टिमेट
बुलढाणा शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थाण राज्य स्तर योजनेचे दिवाळीपूर्वी काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटम आमदार संजय गायकवाड व नगरपालिकेकडून संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहेत.. पाईपलाईनच्या पाच टप्प्यापैकी चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून ठीक ठिकाणी खोदलेल्या ठिकाणी काँक्रीट पॅचेस मारणे सुरू असून पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाइपलाइनची टेस्टिंग देखील सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण योजनेत तब्बल 170 किलोमीटरची पाईपलाईन टाकून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.. त्यामुळे दिवाळीपूर्वीच बुलढाणा शहर वासियांना नियमित गोड पाण्याचा पुरवठा करून दिवाळी गोड केली जाणार आहे..अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी गणेश पांडे यांनी दिली आहे