बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मार्गावर बुलेरो गाडी एसटी बस व खाजगी ट्रॅव्हल्सचा तिहेरी भीषण अपघात 5 जण ठार 24 जणजखमी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मार्गावर बुलेरो गाडी एसटी बस व खाजगी ट्रॅव्हल्सचा तिहेरी भीषण अपघात 5 जण ठार 24 जणजखमी
बुलढाणा जिल्ह्यातील
शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघातात पाच जणांचा मृत्यू…
खाजगी प्रवासी बस एसटी बस व बोलेरो चा भीषण अपघात..
आज 2 एप्रीलच्या सकाळी पाच वाजताच्या सुमारास भरधाव बोलेरो कार आणि एसटी बस समोरासमोर धडकली व पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली…यातील बोलेरो गाडी ही शेगाव कडून खामगाव च्या दिशेने येत होती तर एसटी महामंडळाची बस ही पुण्यावरून परत वाड्याकडे जात होती तर पाठीमागून येणारी खाजगी ट्रॅव्हल्स ही शेगाव मार्गे अमरावतीकडे जात होती अपघात खामगाव ते शेगाव महामार्गावर झाला
या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जखमी आहेत…यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरता पाठवण्यात आले आहे उर्वरित जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत…