35 वा मराठा वधू वर परिचय मेळावा बुलढाण्यात संपन्न
महाराष्ट्र मराठा सोयरीकने सुरू केलेल्या वधू वर परिचय मेळवा लोक चळवळ होत आहे

वधु आणि वरांना यशोचित जीवनसाथी निवडण्याच्या दृष्टिकोनातून सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या वधु वर परिचय मेळाव्याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे असे प्रतिपादन सुनील जवंजाळ यांनी केले..
कल मराठा समाजाच्यावतीने बुलढाणा येथील गर्दी वाचनालयाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र मराठा सोयरीक उपक्रमांतर्गत वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन 5 जानेवारीला करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शन करताना सुनील जवंजाळ बोलत होते ते पुढे म्हणाले की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक पालकांना आपल्या पाल्य चांगलं उच्च शिक्षीत झाला पाहीजे अशी अपेक्षा असते शिक्षण घेतांना मुलांच वय वाढत जातं अशावेळी मुलीचं लग्न करताना तिच्या शिक्षणा योग्य वर मिळणे तिला अपेक्षित असतं तर वय झाल्यामुळे वडिलाला मुलीला शोभेल असा वर शोधण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत त्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातूनच 2016 पासून आपण छोट्या प्रमाणात वधू-वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आता हा कार्यक्रम व्यापक होत चालला असून मराठा समाजातील सर्व पोटजातीचा समावेश महाराष्ट्र मराठा सोयरीक उपक्रमात करण्यात आला आहे असेही सुनिल जवजांळ यांनी सांगितले बुलढाणा येथे 35 वा वधु वर परिचय मेळावा संपन्न होत असल्याचे सांगत या मेळाव्याच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी ही महिलांनी घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेखा सोमनाथ सावळे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीनल आंबेकर यांनी केलं यावेळी प्रास्तविकातून मराठा समाजा अंतर्गत येणाऱ्या सर्व पोट जातीतील घटकांना एकत्र करत मराठा समाजात एकत्र बांधण्याचा काम महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या माध्यमातून केल्या जात असल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ अरुणा चव्हाण संजीवनी शेळके यांनी केलं कार्यक्रमादरम्यान वधूवरांनी आपला परिचय उपस्थितांना करून दिला या वधुवर
परिचय मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सुनिल रामराव शेळके,नारायणराव मिसाळ , अरविंद बापू देशमुख, दिनकरराव बावस्कर ,अशोकराव चौधरी, कडाळे साहेब,, श्री गणेशराव पांडे, श्री सागर पवार,प्राचार्य डॉ. अण्णासाहेब म्हळसणे, भगवान राव कानडजे ,श्री मंगेश मोगल, सुनील सपकाळ , डॉ.पुरुषोत्तम देवकर, लक्ष्मण ठाकरे, ,श्री सुरेश देवकर ,शिवाजीराव तायडे, श्रीकृष्ण जेऊघाले, प्रा रामदास शिंगणे , प्रा गणेश कड, म्हस्के साहेब, सुभाषराव देवकर, गजानन पाटोळे, ऍड विजय सावळे,रमेश काळे,डॉ विनोद जवरे, डॉ मधुकर देवकर, डॉ शोन चिंचोले,प्रकाश काळवाघे, डॉ विक्रम घुले,गणेशराव निकम ,कैलास राऊत, प्रभाकर पाटील काळवाघे ,रमेश बुरकुल, रमेश भोंडे, शिवाजीराव तायडे , माधवराव जपे,डॉ.सत्येंद्र भुसारी, प्रल्हादराव ताठे,नंदूभाऊ सवडतकर , पंढरी सुसर, माधवराव शेळके, भालचंद्र देशमुख, राजेश गायकवाड साहेब, विजय शिरसाट विजयसिंह राजपूत,मीनलताई आंबेकर , डॉ उषाताई खेडेकर , डॉ संजीवनी शेळके, मालिनी सवडतकर, वैशाली म्हस्के,ज्योतीताई पाटील, मालतीताई शेळके ,सुरेखाताई सावळे, तनुजा आडवे , वंदनाताई चव्हाण , चारुशिला पाटील , प्रतिभा भोंडे, प्रतिभा भुतेकर, किरण भोंडे,आशा राजे जाधव, उषा उगले, मंगलाताई पाटील यांनी परिश्रम घेतले