बंड झाले थंड ….माजी आमदार विजयराज शिंदे यांची निवडणुकीतून माघार ….! संजू भाऊंच आव्हान विजुभाऊ पेलु शकले नाही ….!!
माजी आमदार विजयराज शिंदे यांची निवडणुकीतून माघार ….! संजू भाऊंच आव्हान विजुभाऊ पेलु शकले नाही ….!!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नेते व माजी आमदार विजयराज शिंदे त्यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे… दम असेल तर विजयराज शिदे यांनी निवडणूक लढवावीचं अस खुल आव्हान आमदार संजुभाऊनी दिल होत पण ते आव्हान विजुभाऊ पेलू शकले नाही …
नामांकन अर्ज मागे घेतल्यानंतर माजी आमदार विजयराज शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत ते म्हणले की … येथील महायुतीच्या उमेदवारांनी भाजपाच्या नेत्याविरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्य संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर तब्बल 15 मिनिटे चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते मुख्यमंत्री महोदयांनी आमदार संजय गायकवाड यांच्याकडून यानंतर अशी वक्तव्य होणार नाही यासंदर्भात आस्वस्त केले त्यामुळे आपण आपली उमेदवारी मागे घेत असल्याचं विजयराज शिंदे यांनी यावेळी सांगितलं तर पक्षाने आपल्यावर अचलपूर तिवसा मोर्शी या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी टाकलेली असल्याने येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघात काम करणार असल्याची त्यांनी स्पष्ट केलं ..