सलग दोन तास फटाक्याची आतिषबाजी … 49 जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी आणि जयस्तंभ चौकात घेतले महामानवाचे आशिर्वाद आणि सांगण्यात आले दादागिरी चालणार नाही …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खाजगी सचिव विद्याधर महाले यांचा वाढदिवस बुलढाण्यात करण्यात आला दणक्यात साजरा

सलग दोन तास फटाक्याची आतिषबाजी … 49 जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी आणि जयस्तंभ चौकात घेतले महामानवाचे आशिर्वाद आणि सांगण्यात आले दादागिरी चालणार नाही ….मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव भाजप आमदार श्वेता ताई महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त 1 बुलढाणा शहरात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमानिमित्त धाड नाका येथून जल्लोष करत खुल्या जिपमधून रॅली काढण्यात आली बुलढाणा शहरातील चौका चौकात व संपूर्ण शहरच डिजिटल बॅनर लावून रंगवण्यात आले शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या महामानवाच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले त्याचवेळी वीज गेल्यामुळे आमदार श्वेताताई महाले चांगल्याच आक्रमक झाल्यात.. आणि त्यांनी नाव न घेता आमदार संजय गायकवाड यांना ओपन चॅलेंज केले … हा प्रकार का घडला … त्याचा असं झालं की बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र नपाचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांचा 15 ऑगस्टला जन्मदिवस झाला हा अभिष्टचिंतन सोहळा थेट चिखलीमध्ये जाऊन साजरा केला गेला या अभिष्टचिंतन सोहळ्याची चर्चा चिखली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे ॲक्शनला रिएक्शन देणे हे क्रमपात ठरली रणनीती ठरली आणि मुहूर्तही ठरला तो पंधरा दिवसानंतरचा म्हणजेच एक सप्टेंबरचा चिखलीचे आमदार श्वेताताई यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसचा … तो अभिष्टचिंतनाचा सोहळा चिखलीत नव्हे तर बुलढाण्यात घेण्याचे नियोजन झालं आणि तो सोहळा दणक्यात बुलढाणामध्ये साजरा केला गेला एक सप्टेंबरला धाड नाका संगम चौक जयस्तंभ चौक त्रिशरण चौक या चौकाचौकांमध्ये जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करून फटाक्याची आतिबाजी करून बुलढाण्यात माहोल करण्यात आला त्यामुळे कोमात गेलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने चांगलीच उभारी मिळाली बुलढाणा चा इतिहासामध्ये आजपर्यंत असा वाढदिवस कोणत्याही राजकीय सामाजिक नेत्याच्या झाला नाही त्यामुळे या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होऊ लागली आहे बुलढाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघ हे महायुतीतील सत्ताधाऱ्यांचे असल्यामुळे आता महायुतीतील शिवसेना आणि भाजपचा वाद चांगलाच तापला आहे.. हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे…




